By  
on  

सप्तमीनिमित्त तेजस्विनीची सैनिकांना मानवंदना, 'उडवीन तुझ्या चिंधड्या हजार, गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा'

चीनमध्ये करोना विषाणू जन्माला आला आणि त्याने जगभर थैमान घालत मनुष्यप्राण्याला सळो की पळो करुन सोडलं. सर्व जगाची घडी विस्कटली. भारतात अजूनही करोनाचा सुळसुळाट आहे. पण चीन देश  ह्या रोगाच्या महामारीवरच थांबला नाही, तर भारताच्या सीमेवरुन घुसखोरी करत त्याने हरप्रकारे आपल्या देशाला आणि देशवासियांना संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या शूरवीर धडाकेबाज सैनिकांनी हे सीमेवरचं संकट स्वत:च्या जीवाची बाजी लावत परतवून लावलं. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यंदा आपल्या नवरात्र स्पेशल फोटोशूटमधून करोनायोध्दांना सलाम करतेय. तिचं प्रत्येक इल्यूस्ट्रेशन खास आहे. तेजस्विनी पंडीतने म्हणूनच आपल्या आजच्या म्हणजे सप्तमीनिमित्तच्या नवरात्र स्पेशल फोटोशूटमधून देशाच्या सैनिकांना मानवंदना दिली आहे. 
तेजस्विनीच्या ह्या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती ह्या पोस्टला कॅप्शन देत लिहते, “बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने
अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार. ..गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा”

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सप्तमीनिमित्त तेजस्विनीची भारतमातेच्या लेकरांना म्हणजेच सैनिकांना मावंदना . . बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा. .

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

 

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या ह्या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते आणि सध्या कोरोनायोध्द्यांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive