‘भिरकिट’ हा नवा-कोरा सिनेमा येतोय लवकरच, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

By  
on  

 अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून चाहत्यांना या सिनेमाबाबतची प्रचंड उत्सुकता आहे. याचं कारणंही तसंच आहे. यासिनेमानिमत्ताने ऋषिकेश जोशी, गिरीश कुलकर्णा आणि सैराट फेम लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे प्रेक्षकांसमोर येत आहेत . त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे कोडं आहेच. तसंच  अभिनेत्री मोनालीसा बागल आणि तानाजी ही जोडीसुध्दा रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळणार आहे. 

 

 

 

‘भिरकिट’चे मोशन पोस्टर पाहता ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  उडणारा धुरळा, स्कूटर, हाती कलश, हवेत उडणारी ओढणी, मोनालिसाच्या चेह-यावरील स्मित हास्य, सोबतीला तानाजी आणि बॅकग्राऊंडला जबरदस्त म्युझिक या सर्व गोष्टी कमालीची उत्सुकता वाढवत आहेत. पण सर्व काही अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यामुळे सिनेमाच्या टीझर-ट्रेलरची प्रेक्षकांना प्रतिक्षा राहिल एवढं मात्र नक्की.

 

 

 

क्लासीक एंटरप्राईज प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली आहे. या सिनेमाच्या पुढील अपडेटसाठी प्रेक्षक वर्ग नक्कीच आतुर असेल.
 

Recommended

Loading...
Share