अमृता खानविलकरला या भूमिकेसाठी मिळाला ह्या वर्षातला पहिला अवॉर्ड

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दररोज विविध रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करतेय. नऊ दिवसांमध्ये दर दिवशी त्या त्या दिवसांच्या रंगातील पेहराव अमृता करतेय. हिरवा रंग असलेल्या दिवशी अमृताने हिरव्या रंगाच्या साडीतले सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

यासोबतच अमृताने या पोस्टमध्ये खास बातमी शेयर केली आहे. 'चोरीचा मामला' या सिनेमासाठी अमृताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार मिळाला आहे. याच निमित्ताने या पुरस्काराच्या ट्रॉफीसोबतचे फोटो अमृताने पोस्ट केले आहेत. ह्या वर्षांतला अमृताचा हा पहिलाच पुरस्कार आहे. 

अमृता या पोस्टमध्ये लिहीते की, "आजचा रंग आणि हया वर्षातला पहिला अवार्ड. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० पुरस्कार सोहळ्यात “चोरीचा मामला”चित्रपटा साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार" 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#आजचारंग आणि हया वर्षातला पहिला अवार्ड झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० पुरस्कार सोहळ्यात “चोरीचा मामला”चित्रपटा साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मनापासुन धन्यवाद @zeetalkies Thankyou my maddddd director @priyadarshanjadhavv for making me a part of this mad film along with @hemantdhome21 @jitendrajoshi27 @kshiteejog @aniketvishwasrao @kirtimehendale_l ... thankyou for this mad ride

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

या सिनेमात अमृताने श्रद्धाची भूमिका साकारली होती. एका ग्लॅमरस गायिकेच्या भूमिकेत अमृता या सिनेमात दिसली होती. या कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहकलाकार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे झी टॉकिजो कॉमेडी अवॉर्ड्सचे पुरस्कारही 'चोरीचा मामला' या सिनेमाने पटकावले आहे.

Recommended

Loading...
Share