नवरात्री सप्तमीनिमित्त स्मिता गोंदकरचं खास फोटोशूट

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  नवरात्र म्हटलं की महिलांचे सजण्या-नटण्याचे हक्काचे दिवस. 

 करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

 

बिग बॉस फेम मराठी अभिेनत्री स्मिता गोंदकर चेह-यावर विविध रंगांचा कल्कपकतेने वापर करत नवरंगोत्सव यंदा साजरा करतेय. तिची ही संकल्पना प्रचंड हटके आहे. चेह-यावर विविध रंगांचा कल्पकतेने उपयोग करत स्मिता यंदाचा नवरंगोत्सव साजरा करतेय. 

 

स्मिताची ही हटके कल्पना चाहत्यांना प्रचंड आवडली असून त्यांनी ह्या फटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share