साऊथ सुपरस्टार प्रभाससाठी ही मराठी अभिनेत्री शिकतेय तेलुगू भाषा

By  
on  

साऊथ सुपरस्टार प्रभासचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर प्रभासवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातही प्रभासच चाहते आहेत. त्यापैकीच अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील आहे. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने प्राजक्ताने खास पोस्ट केली आहे. 

प्राजक्ताने प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने तेलुगू भाषेत लिहीलं आहे. प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने एक खास गोष्ट यात नमूद केली आहे. प्राजक्ता सध्या तेलुगू भाषा लिहायला, बोलायला आणि वाचायला शिकत आहे. ही गोष्ट तिने या पोस्टमध्ये सांगीतली आहे. प्रभासला डार्लिंग म्हणून संबोधलं जातं. प्राजक्ताने या पोस्टमध्ये डार्लिंग प्रभास असा त्याचा उल्लेख केला आहे.

 

प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीते की, "डार्लिंग.. वाढदिवसाच्या शुभेच्छा. तेलुगू बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकतेय." प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरली आहे.

Recommended

Loading...
Share