ऋता दुर्गुळेने शेअर केला तिच्या ‘Best Friend’ सोबतचा हा फोटो

By  
on  

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात एकतरी खास मित्र किंवा मैत्रिण असतेच ज्याच्याशी आपण अनेक बाबी शेअर करत असतो. बेस्ट फ्रेंडचं आपल्या आयुष्यात खास स्थान असतं. अभिनेत्री ऋता दुर्गुळेनेही तिच्या या बेस्ट फ्रेंडचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. हा बेस्ट फ्रेंड आहे आशुतोष गोखले.

 

 

ऋताने अलीकडेच आशुतोषसोबतचा एक फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. हे दोघेही यात क्युट दिसत आहे. दोघांचीही स्माईल त्यांच्यातील  बाँडिंगला चार चांद लावत आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऋता म्हणते, ‘ हा एकच ज्याच्याशी मी सगळं शेअर करू शकतो. माझ्यासाठी असण्यासाठी थॅंक यू. ऋता आता ‘अनन्या’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

Loading...
Share