By  
on  

या आहेत अभिनेता वैभव तत्ववादीच्या आयुष्यातील खास व्यक्ती

अभिनेता वैभव तत्ववादी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मिडीयावर वैभव त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टींविषयी पोस्ट करताना दिसतो. नुकतच वैभवने सोशल मिडीयावर त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तींविषयी पोस्ट केली आहे.

वैभवच्या आयुष्यातील या खास व्यक्ती म्हणजे त्याचा भाऊ गौरव आणि त्याची आजी.

 

वैभवने भाऊ गौरव आणि आजीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट केली आहे. त्याने भावासोबतचा आणि आजीसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये वैभव लिहीतो की, "माझ्या आयुष्यातील दोन खास व्यक्ती यादोघांसाठी हा खास दिवस योग्य आहे. आजी आणि गौरव. तुम्हाला आनंदी आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा. गौरव, ऑटम एन्ड ब्रीझ फिल्मच्या अंतर्गत आगामी प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत आहे. "

 

Recommended

PeepingMoon Exclusive