By  
on  

कॉमेडी क्वीन श्रेया बुुगडे आता दिसणार नव्या भूमिकेत, जाणून घ्या

'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम आणि त्यातले सर्वच विनोदवीर रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत. यातली कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेसुध्दा रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.तिचे विनोद आणि त्याचं भन्नाट टायमिंग यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी तर आहेच आणि म्हणूनच तिला विविध व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला आवडतंच. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच त्यांना ती एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.  यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे हिने सांभाळली. 

प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हसवण्याचा विडा उचलेल्या प्रत्येक कलाकाराचा सन्मान करणाऱ्या या कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालिकाची भूमिका श्रेया सारखी कॉमेडी क्वीन निभावणार असल्यामुळे यंदाचा सोहळा रंगणार आहे. . यामध्ये तिला महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आणि योगेश शिरसाट यांचीसुध्दा साथ लाभणार आहे. 

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, “यंदाचं झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरूपच खूपच वेगळं होतं. हे अवॉर्ड्स यावर्षी व्हर्च्युअली करण्यात आले आणि त्यात मला सूत्रसंचालनाची जाबदारदारी दिली त्यामुळे थोडं चॅलेंजिंग वाटलं. कारण प्रत्येक वर्षी ऑडियन्समध्ये कलाकार बसलेले असतात ज्यांच्यावर पंच लिहिले जातात किंवा लाईव्ह ऑडियन्स असतानाचा गिव्ह अँड टेक खूप वेगळा असतो.

श्रेया पुढे सांगते, " यंदा सर्व नॉमिनीज आमच्यासोबत व्हर्च्युअली जोडले गेले होते, त्यामुळे हा वेगळाच आणि आव्हानात्मक अनुभव होता. भाऊ कदम आणि योगेश शिरसाट यांनी मला खूप चांगली साथ दिली. आम्हाला हा वेगळा प्रयोग करताना खूप मजा आली आणि प्रेक्षकांना ते बघताना देखील नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे.”

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive