By  
on  

दिग्दर्शक संजय जाधव यांची प्लॅनेट टॅलेंटमध्ये दमदार एन्ट्री

‘प्लॅनेट मराठी’ हे नाव, दिवसागणिक मनोरंजन विश्वातील चर्चेचा विषय बनत चाललं आहे. ‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये दिग्दर्शक संजय जाधव हे नाव जोडलं गेलं आहे. मराठी इंडस्ट्रीची आर्थिक समीकरणं बदलणारा दिग्दर्शक म्हणून ज्याची ओळख आहे ते नाव प्लॅनेट टॅलेंट’ सोबत जोडलं जातंय. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, सायली संजीव, शिवानी बावकर, निखिल चव्हाण ही मंडळी प्लॅनेट टॅलेंटचा भाग आहेत. आता संजय जाधव यांच्या रूपाने प्रथमच एक दिग्दर्शक 'प्लॅनेट टॅलेंट'शी जोडला जातोय.

नजाकतभरा सिनेमॅटोग्राफर ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या संजय यांनी मराठी मनोरंजन विश्वाला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत आणि मराठी इंडस्ट्रीच्या क्षितिजावर नवे स्टार्स घडवले आहेत. ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’, ‘खारी बिस्कीट’, ‘तू हि रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘गुरू’ आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘दुनियादारी’ असे अनेक  चित्रपट संजय जाधव यांनी दिग्दर्शित केले आहेत. अभिनेता, कोरिओग्राफर आणि रिअ‍ॅलिटी शोजचे परीक्षक म्हणून संजयने काम पाहिले आहे. आता संजय जाधवही प्लॅनेट मराठीचा भाग बनल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय, येत्या काळात ते कोणते नवे प्रोजेक्ट्स घेऊन येणार… याबद्दल सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे.   


 

संजय जाधव यांची एक स्वतःची टॅलेंट कंपनी होती. त्यामार्फत त्यांनी अनेकांच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या भूमिका देतं त्यांना नावारूपास येण्यास साथही दिली. पण असं बहुआयामी व्यक्तिमत्व आता ‘प्लॅनेट टॅलेंट’ सोबत जोडलं गेल्यामुळे, संजय जाधव आणि प्लॅनेट मराठी येत्या काळात काय नवीन घेऊन येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठीने जगातील पहिल्यावहिल्या ओटीटी माध्यमाची घोषणा केली.  आता प्लॅनेट टॅलेंटच्या निमित्ताने संजय जाधव या कंपनीशी जोडले जात आहेत. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना काहीतरी हटके पाहता येणारं यात शंकाच नाही, असे निर्माते आणि प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive