By  
on  

आगामी सिनेमात या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार अभिनेत्री मधुरा वेलणकर

मनोरंजन विश्वातील कलाकार अनेकदा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगतात. मग आगामी सिनेमा किंवा एखाद्या खास प्रोजेक्टविषयी माहिती हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्टमधून रिव्हील करतात. अभिनेत्री मधुरा वेलणकरनेही तिच्या आगामी सिनेमाविषय़ी खास पोस्ट केली आहे.

मधुरा तिच्या आगामी सिनेमात अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत झळकणार असल्याचं पोस्टमधून सांगते. "अखेर एकत्र शुटिंग करतोय." असं मधुरा या पोस्टमध्ये लिहीते. याशिवाय पोस्टमधील हॅशटॅग पाहता हे चित्रीकरण जयपुरमध्ये सुरु असल्याचं कळतय. एवढच नाही तर एका हिंदी प्रोजेक्टसाठी हे चित्रीकरण असल्याचही या पोस्टमधून समोर आलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@girishkulkarni1 Finally filming together! #jaypur#film #hindi #nightshifts #cold#fun#work#2020#october#india

A post shared by Madhura Welankar-Satam (@madhurawelankarsatam) on

 

तेव्हा हे दोन्ही अनुभवी, लोकप्रिय कलाकार या आगामी सिनेमातून प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे याकडे अनेकांचं लक्ष राहील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive