By  
on  

अभिनेता शांतनु मोघेची ही भूमिकाही ठरतेय लक्षवेधी, शेयर केले मालिकेच्या सेटवरील हे फोटो

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत अभिनेता शांतनु मोघे शहाजीराजे महाराजांची भूमिका साकारत आहे. याआधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या दोन्ही भूमिकांसाठी त्यांचं बरचं कौतुक होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"SHAHAJI RAJE MAHARAJ" Working stills.. @swarajanani_jijamata_official on @sonymarathi

A post shared by Shantanu S. Moghe (@shantanusmoghe) on

 

शांतनु हे सोशल मिडीयावर इतक्या मोठ्या प्रमाणात सक्रिय नसले तरी त्यांच्या कामाविषयीच्या बऱ्याच गोष्टी ते सोशल मिडीयावर शेयर करताना दिसतात. नुकतच शांतनु यांनी त्यांचे सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या सेटवरील काही फोटो त्यांनी शेयर केले आहेत.
त्यांच्या या भूमिकांसाठी त्यांच्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून जिजाऊंसह छत्रपती शिवाजी महाराजांची गाथाही सांगीतली जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive