By  
on  

'आई कुठे काय करते'मधील संजनाचे रियल लाईफ बॉयफ्रेंडसोबतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

विविध हिंदी, मराठी मालिका सिनेमा केल्यानंतर मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री रुपाली भोसले दिसली होती. या कार्यक्रमानंतर रुपाली चांगलीच लोकप्रिय ठरली. त्यानंतर आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजनाच्या भूमिकेत दिसत आहे. या लोकप्रिय मालिकेतील तिची ही भूमिका चांगलीच लक्षवेधी ठरतेय. 
मात्र सोशल मिडीयावर चर्चेत आहे ते रुपालीचं रियल लाईफ अफेअर. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर रुपाली आणि निर्माता अंकित मगारे यांचं प्रेम जुळलं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. आणि आता सोशल मिडीयावर तर त्यांचे फोटो कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळतय. 


अंकितने नुकतेच रुपालीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये अंकितने रोमँटिक कॅप्शन लिहीलं आहे. तो लिहीतो की, "तुला शोधणे हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं आणि मला मिळालेली सर्वोत्तम भेटवस्तू "
रुपाली आणि अंकित या जोडीच्या चाहत्यांनी आता रुअँक हे हॅशटॅगही बनवलं आहे. त्यांनाही हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive