By  
on  

पाहा Video : या कारणासाठी एकत्र झळकले नेहा खान आणि पुष्कर जोग

अभिनेता पुष्कर जोगला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड आहे. सिनसृष्टीत काम करत असताना पुष्कर त्याच्या नृत्याची हौस भागवत असतो. मात्र ही आवड वेगळ्या पद्धतिने जोपासण्याचं पुष्करने ठरवलं आणि सुरु केलं त्याचं युट्यूब चॅनेल. या युट्यूब चॅनेलवर पुष्कर त्याचे विविध डान्स व्हिडीओ पोस्ट करतो. 

नुकताच पुष्करने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या डान्स व्हिडीओच्या निमित्ताने अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना नेहा खान यांनी एकत्र डान्स केला आहे. ही जोडी पहिल्यांदाच या डान्स व्हिडीओच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळतेय.

 

गुरु रांधवाच्या 'नाच मेरी रानी रानी' या गाण्यावर हा डान्स व्हिडीओ करण्यात आला आहे. शिकारी या सिनेमातील नेहा खानची बोल्ड भूमिका लक्षवेधी ठरली होती. डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्येही हिना स्पर्धक म्हणून दिसली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive