By  
on  

पाहा Video : हा व्हिडीओ पोस्ट करून अमेय वाघ म्हणतो, ये “ऊन” दिनों की बात है

सोशल मिडीयावर अभिनेता अमेय वाघ काहीना काही मजेशीर पोस्ट करत असतो. उत्तम ह्युमर असलेला हा अभिनेता सोशल मिडीयावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांनाही त्याच्या विविध पोस्ट आवडतात. एखादा फोटो पोस्ट केला की त्यावर हटके कॅप्शन आणि एखादा व्हिडीओ पोस्ट केला तर त्यात सरक्याझम असं कॉम्बिनेशन असतं.

अमेयने नुकताच एक सेल्फि व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने गाडीत प्रवासादरम्यान केलेला हा व्हिडीओ आहे. अभिनेता सिद्धांत चर्तुवेदीच्या 'धूप' गाण्यावर त्याने हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओसाठी अमेयने धमाल कॅप्शन लिहीलं आहे. अमेय लिहीतो की, "ये “ऊन” दिनों की बात है"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

उन्हात शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये अमेयसोबतच सुर्यकिरणेही दिसत आहेत. याच सुर्यकिरणांचा व्हिडीओत इफेक्ट म्हणून वापरत अमेयने हा व्हिडीओ केला आहे. अमेयचा हा व्हिडीओ आणि त्याचं धमाल कॅप्नश त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive