By  
on  

नव्या फोटोशूटमध्ये संजना फेम रुपाली भोसले दिसली खुपच सुंदर

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ह्या मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. यापैकीच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय आणि अल्पावधीतच तिने रसिकांची मनंसुध्दा जिंकलीयत. काहीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका रुपाली एकदम तंतोतंत वठवतेय. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होतंय.  

रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नवनवे फोटोशूट ती चाहत्यांशी शेअर करते. तिने नुकतंच एक ट्रेडीशनल आऊटफिटमधलं एक सुरेख फोटोशूट शेअर केलं आहे. 

 

 

 

अभिनेत्री रुपाली भोसले ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली होती.  या तिने फायनलपर्यंत धडक मारली. 

 

रुपाली भोसले ही निर्मात अंकीत मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. याचा खुलासा तिनेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला आहे. 

 

नेहमीप्रमाणेच रुपालीच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive