By  
on  

उर्मिला कोठारे आणि जिजाचं हे मजेदार वर्कआउट सेशन पाहिलत का?

सेलिब्रिटींपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा कुणाची असेल तर ती स्टारकिड्सची. बॉलिवूडमध्ये तर अनेक स्टारकिड्स लाईमलाईटमध्ये असतात. या बाबतीत मराठी स्टारकिड्सदेखील मागे नाहीत बरं का! मराठी स्टारकिड्समध्ये सगळ्यात आघाडीचं नाव कुणाचं असेल तर ते जिजा कोठारे. आजोबा, आई, बाबा असा भरभक्कम फ़िल्मी पार्श्वभूमी असताना जिजामध्येही काही अंशी तो चार्म आहे.
उर्मिला आणि आदिनाथही जिजासोबातच्या मस्तीचे व्हिडियो शेअर करत असतात. आताही उर्मिलाने जिजासोबातच्या वर्कआउटचा व्हिडीयो शेअर केला आहे. यामध्ये जिजा आईसोबत वर्क आउट करताना दिसत आहे. यामध्ये मायलेकींमधील मस्ती देखील दिसून येत आहे. जिजाचं दिलखुलास हसू पाहून तुमच्याही चेह-यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

https://www.instagram.com/p/Bu8Y622hkrS/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive