By  
on  

पाहा Video : रिंकू राजगुरुच्या या नखरेल अदा एकदा पाहाच

अभिनेत्री रिंकू राजगुरु आता सिनेविश्वात तिची वेगळी ओळख बनवू पाहतेय. सैराट फेम रिंकू राजगुरु अशी तिची ओळख हळूहळू आता अभिनेत्री रिंकू राजुगुरु अशी होताना दिसत आहे. काही सिनेमे केल्यानंतर आता छुमंतर या नव्या द्विभाषिक सिनेमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

 सोशल मिडीयाच्या माध्यमातून रिंकू तिच्या चाहत्यांसाठी विविध पोस्ट करते. या पोस्टमधून रिंकूचं प्राणीप्रेम, व्यायाम या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. नुकताच रिंकूने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. छोट्याश्या या व्हिडीओतही रिंकूच्या अदा पाहायला मिळत आहेत. रिंकू आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली दिसतेय. सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्गही आहे.

सैराटनंतर रिंकू कागर आणि मेकअप या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती. लॉकडाउनच्या काळात 'हंड्रेड' या वेब सिरीजमधून रिंकूने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive