By  
on  

दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’

अक्षय इंडीकर या मराठी तरुणाच्या दिग्दर्शनाचा झेंडा आता सातासमुद्रापार फडकला आहे.  आशियाचा ऑस्कर अशी ओळख असलेला यावर्षीचा ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. अक्षयच्या ‘स्थलपुराण’ या सिनेमाने पुन्हा एकदा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

 ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या पुरस्कार जाहीर केला जातो. आशियातील 70 देशांमधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. स्थलपुराणने बर्लिन आणि ब्राझील येथील प्रसिद्ध चित्रपट महोत्सवात देखील ठसा उमटवला आहे.  अत्यंत कमी वयात अक्षय यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्थलपुराण' ही कोकणातील एका गावात घडणारी गोष्ट आहे. गोवा राज्यात चित्रित झालेला हा चित्रपट आठ वर्षांच्या दिघू नावाच्या अतिशय लोभसवाण्या मुलाची गोष्ट आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive