By  
on  

Video : मराठीतल्या राज आणि सिमरनची ही रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहिलीत का?

मराठी सिनेसृष्टीची  अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये आहे. अभिनेता-लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे सोबत ती आगामी सिनेमाचं शूटींग करतेय. डेट-भेट असं या नव्या-को-या मराठी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या सेटवर नुकतेच सोनाली आणि हेमंत फुल ऑन फिल्मी मूडमध्ये दिसले. बॉलिवूडचा क्लासिक आणि सुपर-डुपर हिट सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले ं जायेंगे च्या राज आणि सिमरन म्हणजेच शाहरुख खान व काजोलसारखे जरा सा झूम लूॅं में... या नशिल्या गाण्यावर थिरकले. 

सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा अफलातून  रील व्हिडीओ शेअर केला आहे.  यात सोनाली आणि हेमंतचा सो कॉल्ड रोमान्स पाहायला मिळतोय. 

 

 या धमाकेदार रील व्हिडीओसह सोनालीने हेमंतसोबतचे काही रोमॅण्टीक फोटोसुध्दा चाहत्यांशी शेअर केले आहेत.

 

या फोटोंवरुन चाहत्यांना आता सिनेमाबाबतची चाहत्यांना बरीच उत्सुकता लागुन राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive