By  
on  

एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा गोड फोटो

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ९० ची दशकांत आपल्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीने मराठी सिनेसृष्टीत धम्माल उडवून दिली. अनेक सिनेमांमधून ह्या जोडीने रसिकांचं मनोरंजन केलं आणि ते करता करता नकळत एकमेकांच्या प्रेमातही पडले. आता लग्नाला इतके वर्ष उलटली तरी यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सतत ते एकमेकांची काळजी घेताना पाहायला मिळतात. 

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकताच इन्स्टाग्रामवरुन पती आणि अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा हा गोड फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. निवेदिता यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केलाय. 

निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली अग्गंबाई सासूबाई ही झी मराठीवरील सुपरहिट मालिका रसिकांच्या पसंतीस उतरेतय आणि निवेदिता यांच्या आसावरी या व्यक्तिरेखेचं कौतुकही होतंय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive