By  
on  

या को-स्टारसोबत काम करताना श्रिया पिळगावकर होते नर्व्हस

वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री श्रीया पिळगावकर  सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने लाडक्या कोस्टारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

 

 

श्रियाची ही लाडकी कोस्टार आहे तिची आई सुप्रिया. श्रियाने काही फोटो शेअर केले आहेत. सुप्रिया आणि श्रिया एका अ‍ॅडसाठी शूट करताना दिसत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये श्रिया म्हणते, ‘ एकमेव सुंदर कोस्टार जिच्यासोबत काम करताना मला नर्व्हस वाटतं. मला आमचा ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन ड्रामा खुप आवडतो.’  श्रिया अलीकडेच  ‘क्रेकडाऊन’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिरीजमध्ये पहिल्यांदाच ती अ‍ॅक्शन सीक्वेंस  साकारताना दिसली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive