By  
on  

रितेश देशमुखच्या ‘Mumbai Film Company’ बाबत जेनिलिया म्हणते, ‘ कॅमेरामागेही वेगळंच जग असतं हे यामुळे समजलं’

 
बॉलिवूडमध्ये आपल्या लोभस लुकने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे जेनेलिया देशमुख. अभिनयात करीअरची सुरुवात केल्यानंतर 2012 साली अभिनेता रितेश देशमुखसह विवाहबंधनात अडकल्यानंतर मुलं राहिल व रियान यांच्या संगोपनातच जेनेलिया व्यस्त झाली. त्यानंतर लय भारी, फास्टर फेणे, माऊली या मराठी सिनेमाची ती यशस्वी निर्माती होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

रितेश आणि जेनिलिया देशमुखच्या ‘Mumbai Film Company’ने या सिनेमांची निर्मिती केली होती. जेनिलियाने नुकतीच ऑफिमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जेनिलिया म्हणते, ‘ अलीकडेच आमच्या ऑफिसमध्ये गेले होते. ‘Mumbai Film Company’ सुरु होईपर्यंत कॅमेरासमोर असणं हेच महत्त्वाचं काम आहे असं मी समजत होते. काहीच सिनेमे पण स्पेशल सिनेमे. रितेश आपण उत्तम काम केलं आहे. अजून खुप गोष्टी सांगायच्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive