बोल्ड दृश्यांवरून ट्रोल होण्यावर अखेर प्रिया बापट काय म्हणाली...

By  
on  

सध्या सगळीकडे वेबसिरिजचं वारं वेगाने वाहत आहे. या वेबसीरिजच्या विश्वात 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसीरिज सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. अभिनेत्री प्रिया बापट ही या वेबसिरीजमध्ये अभिनय करत असून तिच्या बोल्ड दृश्याची सगळीकडे चर्चा आहे. अभिनेत्री गितीका त्यागी आणि प्रिया बापट यांच्यामध्ये असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे अभिनेत्री प्रिया बापटला सोशल मीडिया वर ट्रोल केलं गेलं.

"बापटांची पोरगी वाया गेली रे..." यांसारखी वाक्य वापरुन प्रिया बापटच्या या दृश्यावर अनेक जणांनी टिकेची झोड उठवली. अखेर प्रिया बापटने याबाबतीत मौन सोडलं. 'याआधीही मला छोट्या कपड्यांवरून ट्रोल केलं आहे. सिटी ऑफ ड्रीम्स पाहिल्याशिवाय ते दृश्य वेबसीरीजमध्ये का आहे हे कळणार नाही', अस मत प्रिया बापटने व्यक्त केलं.

प्रियाच्या या दृष्याबाबत तीला ट्रोल  केलं असलं तरी अनेक जणांनी तीची प्रशंसा केली आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स मध्ये चालतं मग आपल्याकडे का नाही?', 'प्रियाने समलिंगी पात्रं साकारले म्हणून नकारात्मक  करणाऱ्यांची कीव वाटते.' अशा शब्दांमध्ये खूप जणांनी तीची पाठराखण केली आहे.

https://www.instagram.com/p/Bw89zaLhVn4/

'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसीरिज हॉटस्टार या ऑनलाईन माध्यमावर सध्या गाजत आहे. अभिनेत्री प्रिया बापट, सचिन पिळगावकर’ सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांच्या या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका असून नागेश कुकुनूर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

 

Recommended

Loading...
Share