By  
on  

प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘ब्लँकेट’ सिनेमा

समाजाचे प्रतिबिंब म्हणून चित्रपट माध्यमाकडे पाहिले जाते. जगण्यातल्या जाणीवा शोधत प्रत्यक्ष जीवनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले आहेत. स्त्री जाणिवांचा वेध घेणाऱ्या ‘ब्लँकेट’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. माय-लेकींच्या जगण्याचा संघर्ष दाखविणाऱ्या माय स्काय स्टार एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘ब्लँकेट’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज गोरडे करीत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मा. विलास मडगिरी यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. अॅडव्होकेट सतीश गोरडे याप्रसंगी उपस्थित होते.

काळ कितीही बदलला आणि स्त्रीशिक्षणाची आणि सक्षमीकरणाची आपण कितीही टिमकी वाजवली तरी आजही स्त्रियांना समाजात दुय्यम वागणूक दिली जाते हे कटू सत्य आहे. सक्षम असून देखील स्त्रीच्या प्रत्येक निर्णयावर घरातील कर्त्या पुरुषाची संमतीची मोहोर लागणं महत्त्वाचं मानलं जातं. स्त्रियांच्या आशा-आकांक्षाना पायदळी तुडविणाऱ्या समाजातील मानसिकतेवर भाष्य करणारा ‘ब्लँकेट’ जगण्याचा एक वेगळा पैलू दाखवेल, असेदिग्दर्शक राज गोरडे सांगतात.

‘ब्लँकेट’ चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. चित्रपटाची निर्मिती आकाश शिंदे यांनी केली असून कथा-पटकथा-दिग्दर्शनाची जबाबदारी राज गोरडे यांनी सांभाळली आहे. संवाद राज गोरडे व नितीन सुपेकर यांचे तर संगीत रोहित नागभिडे यांचे असेल. छायांकन-योगेश कोळी, संकलन-रोहन पाटील, साऊंड डिझाइनर-महावीर साबन्नवार, कलादिग्दर्शन-दत्ता लोंढे आणिव्यवस्थापन मयूर म्हस्के अशी इतर श्रेयनामावली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive