By  
on  

महागुरू सचिन पिळगावकर म्हणतायत,‘लव्ह यू जिंदगी’

महागुरू सचिन पिळगावकर आता कुठल्या नवीन वादात तर नाही ना सापडले किंवा त्यांना कोणी पुन्हा ट्रोल तर नाही ना केले, म्हणून ते असं मुद्दामून वगैरा टोमणा मारण्यासाठी म्हणतायत....असा तुम्ही विचार करत असाल..पण तसं अजिबातच नाहीय. अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह यू जिंदगी’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात‘लव्ह यू जिंदगी’...! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगी' मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं. या पोस्टरचं वैशिष्ट्य म्हणजे सचिन पिळगावकर एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमातून सचिन पिळगावकर यांनी अनिरूद्ध दाते यांची भूमिका साकारलेली असून त्यांच्या आयुष्यातील गंमती जमती आपल्याला यातून अनुभवायला मिळणार आहे.

खुद्द सचिनजींनीच आपल्या या आगामी सिनेमाची माहिती आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केली तसंच पोस्टरसुध्दा उलगडलं आहे.हे पोस्टर शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनसुध्दा दिलं आहे. “जगभरात प्रेमाच्या इतक्या भाषा असल्या तरी हा अनिरुद्ध दाते तुम्हाला सांगणार आहे जिंदगीला प्रेमाने कसं जिंकायचं याची नवी परिभाषा! १४ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात !!!” सचिनजी यांच्या व्यक्तिरिक्त सिनेमातील इतर कलाकारांचा उलगडा अद्याप झालेला नाही.

एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या सिनेमाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली 17 वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेमा दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.

‘लव्ह यू जिंदगी’ हा सिनेमा यंदा  14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/p/Bn_aOvQgZEq/?taken-by=luzindagifilm

‘लव्ह यू जिंदगी’ हा सिनेमा येत्या 14 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive