By  
on  

‘शुभलग्न सावधान’चं ओ साथी रे...हे गाणं तुम्ही पाहिलंत का?

सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभलग्न सावधान’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील ओ साथी रे.. हे गाणं नुकतंच उलगडलं आहे. गायिका बेला शेंडे हिच्या सुमधूर आवाजात हे गाणं स्वरबध्द करण्यात आलं आहे.

‘शुभलग्न सावधान’ या सिनेमात सुबोध आणि श्रृती यांच्या अनोख्या लग्नाची कथा पाहायला मिळणार आहे. एकमेकांना आवडल्यापासून ते लग्न ठरल्यापर्यंतचा त्यांचा हा आजच्या तरुण जोडप्यांचं प्रतिनिधीत्व करणारा हटके प्रवास पाहता येणार आहे. ओ साथी रे..या गाण्यात सुबोध आणि श्रृती साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये दुरावा आल्याचे दिसून येत आहे. पण हे गाणं व त्याच्याशी निगडीत प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंत वाट पाहावीच लागेल.

श्रृती आणि सुबोधबरोबरच सिनेमात सिनेमात निर्मिती सावंत, गिरीश ओक, विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत

लग्नसमारंभ म्हटलं की संपूर्ण कुटुंबात लगीनघाईला जोरदार सुरुवात होते. लग्नसोहळ्याची धम्माल लग्न जुळण्यापासून ते डोक्यावर अक्षतापडेपर्यंत सुरूच असते. हा अनुभव प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी घेतोच. हे क्षण फक्त जपण्यासाठीच असतात. म्हणूनच आधुनिक युगातल्या जोडप्याची कथा मांडणारा ‘शुभलग्न सावधान’ हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित आहे.

https://youtu.be/v2WPs-JAsII

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाच्या निर्मितीची धुरा फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांनी सांभाळली आहे. ‘शुभलग्न सावधान’येत्या 12 ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ सिनेमासाठी सर्व प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive