By  
on  

फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘हलाल’ सिनेमाला आठ नामांकनं

प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अमोल कागणे फिल्म्सच्या ‘हलाल’ सिनेमाला एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकने हलालने पटकावली आहेत.

अमोल कागणे फिल्म्सची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘हलाल’ने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले. राज्य पुरस्कारांसह बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला होता. आता फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्येही सिनेमाने नामांकनं मिळवली.

शिवाजी लोटन पाटील यांना दिग्दर्शनासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रियदर्शन जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रीतम कागणेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स नामांकन आणि पदार्पणासाठीही नामांकन मिळालं. तसंच चिन्मय मांडलेकरला सहाय्यक अभिनेत्यासाठी, मौला मौला गाण्यासाठी सईद अख्तर आणि सुबोध पवार यांना सर्वोत्कृष्ट गीतासाठी तर राजन खान यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी व निशांत ढापसे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी नामांकन प्राप्त झाले आहे.

“फिल्मफेअर पुरस्कारांविषयी लहानपणापासून मनात कुतुहल आहे. या पूर्वी अनेकदा हा सोहळा टीव्हीवर पाहिला आहे. आता आपल्या सिनेमासाठी फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे नामांकन मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. आजवर सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी फिल्मफेअरची नामांकनं नक्कीच स्पेशल आहेत,” अशी भावना निर्माते अमोल कागणे यांनी व्यक्त केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive