By  
on  

रोहित-जुईली म्हणतायत, ‘येना शोना येना’

मराठी रॉकस्टार रोहित राऊत आणि जॅझी गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र येऊन सिनेमासाठी पार्श्वगायन केलं आहे.आगामी बॉईज-2 या सिनेमात या दोघांचे पहिले गाणे ऐकायला मिळणार आहे. नुकतेच युट्यूबवरून सिनेमातलं अवधूत गुप्तेने संगीतबध्द केलेले ‘येना शोना येना’ हे त्यांचे नुकतंच गाणे लाँच झाले आहे.

या गाण्यासंदर्भात रोहित राऊत सांगतो, “इतके वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. पण एका सिनेमात एकत्र एक गाणं गाण्याची संधी आम्हांला पहिल्यांदाच मिळाली. आम्ही काही दिवसांपूर्वी लोकाग्रहास्तव एकत्र कव्हर साँग गायलो होतो. त्याला चांगला प्रतिसाद आल्यावर आता हे रोमँटिंक गाणं गाण्याची संधी आम्हांला मिळाली. अवधूतदादाने खूप छान संगीतबध्द केलेले पटकन ओठांवर रूळणारे हे गाणे आहे.”

जुईली जोगळेकर गाण्यासंदर्भात म्हणाली, “अवधूतदादा माझा आवडता संगीतकार आहे. माझा आवाज खूप बोल्ड असल्याने मला रोमँटिक गाणं गाण्याची संधी खूप कमी मिळते. पण अवधूतदादाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हे रोमँटिक गाणं गाण्याची संधी दिली, याचा मला आनंद आहे. मध्यंतरी मी आणि रोहितने आमच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून लाइव्ह चॅट केले होते. त्यावेळी आम्ही एकत्र पार्श्वगायन करावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. ती ह्या गाण्यामूळे पूर्ण झाली आहे.”

https://youtu.be/mtqKENSg1V4

Author

Recommended

PeepingMoon Exclusive