By  
on  

म्हणून लता मंगेशकर यांचा वाढदिवस महेश कोठारे यांच्यासाठी आहे खास

मराठी सिनेसृष्टीत धडाकेबाज कामिगरी करणारे प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासाठी आजचा दिवस खुपच खास आहे. तुम्ही म्हणाल असं काय आहे, आज ज्यामुळे त्यांना इतका आनंद होत आहे. चला, तर या त्यांच्या दुहेरी आनंदामागचं रहस्य तुम्हाला सांगायलाच हवं.

आज भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे, हे आपण सर्वच जाणतो. हाच दिवस महेश कोठांरेंसाठी विशेष ठरलाय,कारण आज त्यांचासुध्दा वाढदिवस आहे. आपला जन्मदिन लतादीदींबरोबर शेअर करण्यात महेश कोठारेंना फक्त आनंदच नाही तर अभिमान पण वाटतोय. म्हणूनच महेशजींनी हा आनंद ट्विटरवरुन व्यक्त केला आहे.

https://twitter.com/maheshkothare/status/1045511860974489600

धुमधडाका हा महेश कोठारे यांचं दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय असलेला पहिलाच सिनेमा. डॅम इट...या दमदार संवादाने सिनेरसिकांना रुबाबदार पोलिसाच्या भूमिकेतून महेशजींनी भुरळ पाडली.

गुपचूप गुपचूप, घरचा भेदी, झपाटलेला, थरथराट, धांगडधिंगा, दे दणादण,थरथराट, माझा छकुला, पछाडलेला, शुभमंगल सावधान, जबरदस्त, खबरदार अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांच्या निर्मिती-दिग्दर्शन आणि अभिनयाची धुरा सांभाळली. मेहश कोठारेंची निर्मिती असलेली जय मल्हार या मालिकेने तर लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले.

मराठी सिनेसृष्टीतील महेशजींचं योगदान अमूल्य आहे. त्यांनी अनेक दर्जेदार मनोरंजनपर सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. पिपींगमून मराठीतर्फे सिनेसृष्टीतील धडाकेबाज दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांना वाढदिवसानिमित्त व पुढील यशस्वी वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा !

Author

Recommended

PeepingMoon Exclusive