By  
on  

जेव्हा कुशल बद्रिके बनला कबीर सिहं तेव्हा असं घडलं, पाहा व्हिडीओ :

चला हवा येऊ द्या या विनोदी रिएलिटी शोमधील सर्व कलाकार हे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. कधी विविध कलाकारांच्या नकला करुन तर कधी विविध पेहरावात येऊन कॉमेडी करत सगळ्यांनाच खळखळून हसवतात.
नुकत्याच एका भागातही चला हवा येऊ द्या या शोमधील या विनोदवीरांनी विविध भूमिका साकारल्या यावेळी भाऊ कदम हा रणवीर सिंह बनल होता, योगेश शिरसाट हा अजय देवगण तर श्रेया बुगडे ही आलिया भट बनली होती. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेता कुशल बद्रिके नेमका कोणता कलाकार साकारतोय हा प्रश्न सगळ्यांना पडला. आणि हा सगळा मजेशीर मेकअप रुममधील व्हिडीओ कुशलने नुकताच पोस्ट केला आहे. 

कुशलला पाहून तो चक्क अनील कपूर सारखा दिसतोय असे त्याची ही मित्र मंडळी बोलतात. मात्र जेव्हा सगळे कुशलला तू कोणता अभिनेता साकारतो आहेस असे विचारतात तेव्हा तो “कबीर सिंह बनलोय” असं उत्तर देतो. आणि त्याच्या या उत्तरावर हे सगळे कलाकार हसू लागतात. सोशल मिडीयावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे.

 कबीर सिंहच्या वेशातील कुशल बद्रिकेचं रुप पाहून या कलाकारांना हसू आलयं मात्र कुशलने नेहमीप्रमाणे त्याच्या याही पात्रात कमाल केलीय यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive