By  
on  

Quarantine : श्रेया बुगडेने पतीच्या वाढदिवसासाठी घरीच बनवला खास केक

करोनाने जो देशभर धुमाकूळ घातला आहे त्याला रोखण्यासाठी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे घरात राहा सुरक्षित राहा असं धोरण अवलंबण्याच आवाहन करण्यात आलां आहे. दैनंदिन सेवा व वस्तूंचा पुरवठा वगळता कुठलीही दुकानं आज सुरु नाहीत, त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडीफार आपल्या आवडत्या गोष्टींना, सेलिब्रेशनला या काळात मुरड घालावी लागतेय. पण जे काय सुरु आहे, ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच. आपल्या चांगल्या आरोगयासाठी. 

आज १ एप्रिल आणि याच दिवशी विनोदांची राणी श्रेया बुगडेच्या पतीचा म्हणजेच निर्माते निखिल शेठ यांचा वाढदिवस. घरच्या घरी पण सेलिब्रेशन तर करायचंच आहे आणि वाढदिवसाचं सेलिब्रेसन केकशिवाय अपूर्ण. मग श्रेयानेच कंबर कसली. यूट्यूब व्हिडीओ आणि अपर्णा दीक्षित यांच्या मार्गदर्शन व रेसिपी घेऊन घरीच झक्कास केक बनवला. पहिला प्रयत्न असला तरी श्रेया त्यात यशस्वी ठरली. चॉकलेट केक व त्यावर रंगीबेरंगी जेम्सच्या गोळ्या...आहाहाहा..पतीही झाले खुश! क्या बात..

श्रेया जशी चला हवा येऊ द्याच्या मंचावर परफॉर्मन्स देते तसाच जबरदस्त परफॉर्मन्स तिने केक बनवून  दिला आणि वाढदिवससुध्दा छान सेलिब्रेट झाला. 

खरंच क्वारंटाईन काळात कधी नव्हे अशा छान आठवणी जपण्याची, आपल्या माणसांसाठी काहीतरी करुन दाखविण्याची संधी मिळालीय. चाला मग, आपण सगळेच याचा ससदुपयोग करुयात. 

Recommended

PeepingMoon Exclusive