अभिनेता सचिन पिळगावकर घरात बसून अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

By  
on  

लॉकडाउनमुळे घरातच असल्याने सध्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी सगळ्यांकडे बराच वेळ आहे. या वेळेच सदुपयोग कसा करायचा हे सध्या आपल्या हातात आहे. यासाठी बरेच कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध आवाहन करत आहेत. 

प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर सध्या घरात बसून वर्कआउट करून आरोग्याची काळजी घेत आहेत. नुकताच त्यांनी त्यांचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सचिन म्हणतात की, “मित्रहो आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायची असते. आपल्या वया नुसार क्षमते नुसार व्यायाम करणं गरजेचे आहे. आपलं शरीर शॉक मोडमध्ये जाण्याआधी दररोज विविध वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा. मी एक दिवस क्रॉस ट्रेनिंग आणि फंक्शनल ट्रेनिंग करतो. एक दिवस कार्डिओ करतो. आणि एक दिवस किक बॉक्सिंग करतो. हे सर्व घरी राहून करता येतं. तुम्ही तुमच्या आवडी नुसार वेगळं ही काही करू शकता. कृपया काळजी घ्या ही विनंती.”


या पद्धतिने वर्कआउट करुन आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट करून सचिन पिळगावकर सगळ्यांना आवाहन करत आहेत. या व्हिडीओतून तरुणांसह कित्येकांना सध्याच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून आरोग्याची कशी काळजी घेता यावी याविषयी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. 
 

Recommended

Loading...
Share