पाहा Video :अभिनेता सचिन पिळगावकर यांची इन्स्टाग्रामवर एन्ट्री 

By  
on  

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरातच नाही तर जगभरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थिती लॉकडाउनच्या काळात घरात बसून सकारात्मक राहणं गरजेचं आहे. यासाठी कलाकार मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध प्रकारे आवाहन करत आहेत. याच निमित्ताने अभिनेता सचिन पिळगावकर यांनी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. 

सचिन पिळगावकर यांच्या या नव्या अकाउंटवर पहिलीच फोटो पोस्ट ही मुलगी श्रियासोबतची आहे. इन्स्टाग्रामवर त्यांची एन्ट्री होताच बऱ्याच कलाकारांनी त्यांना वेलकम केलं आहे. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना सध्याची परिस्थितीसाठी आवाहन करण्यासाठी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. सचिन पिळगावकर या पोस्टमध्ये म्हणतात की, “तुम्ही सगळे काळजी घेत आहात ना? सध्या घरात बसणचं गरजेचं आहे. आपण आपली काळजी घेणं आणि कुटुंबासोबत घरातचं राहणं सध्या खूप गरजेचं आहे. घरातच आपली करमणूक करून घ्यायची आणि लोकांना एन्टरटेन करायचं. माझ्यासारख्या माणसाला जर ते सोपं असेल तर तुमच्यासाठी तर जास्त सोपं आहे. कारण गाणं तर प्रत्येक माणूस कुठेही गाऊ शकतो. असं समजा की आपण एका पार्क मध्ये आहोत आणि मजा करतोय. म्हणूनच घरीच राहा”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My first picture on @instagram has to be with the person who got me here ! @shriya.pilgaonkar

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar) on

कला विश्वातील बहुतांश कलाकार हे इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यातच सचिन पिळगावकर यांची एन्ट्री झाल्याने नक्कीच काही रंजक गोष्टी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील यात शंका नाही.
 

Recommended

Loading...
Share