पाहा Video : लहानपणी पापा सचिनसोबत श्रिया गायची हे गाणं

By  
on  

लॉकडाउनचा हा काळ कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी घेऊन आला आहे. या निमित्ताने रोजचं धकाधकची आयुष्य सध्या नसल्याने घरात बसून कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतोय.

अभिनेत्री श्रिया पिळगावकरही तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. श्रियाला गायनाची आवड असल्याचं नुकतच तिने केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतय. सचिन पिळगावकर हे एक उत्तम गायक हे सगळ्यांना माहितीच आहे. मात्र श्रियाही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. नुकताच श्रियाने वडील सचिन यांच्यासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रिया आणि सचिन पिळगावकर एकत्र गाणं गात आहेत. ‘हाल कैसा है जनाब का’ हे गाणं त्यांनी गायलयं. सोशल मिडीयावर हा गोड व्हिडीओ चर्चेत आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

One of my favourite Madan ji and Lata didi’s combination songs .

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar) on

 

 यासोबतच या गाण्याविषयीची खास आठवण श्रियाने या पोस्टमध्ये लिहीली आहे. श्रिया लिहीते की, “हे गाणं मी लहानपणी पापासोबत गुणगुणायची. मी अजूनही त्यांच्यासाठी लहानच आहे आणि आजही आम्हाला दोघांना हे गाणं आवडतं." तर नुकतच सचिन पिळगावकर यांनीही इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. ते देखील काही गाण्याचे व्हिडीओ सध्या लॉकडाउनमध्ये पोस्ट करत आहे.
 

Recommended

Loading...
Share