By  
on  

या अभिनेत्रीने दिला जुन्या आठवणींना उजाळा, म्हणते #MeAt20 नाही 18 म्हणा

ल़ॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर आणखी वाढला आहे. त्यातच विविध चॅलेंज सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. यातच #MeAt20 हे चॅलेंज सध्या प्रचंड गाजतय आणि व्हायरल होत आहे. या चॅलेंजमध्ये 20 वर्षांचे असतानाचे फोटो पोस्ट केले जात आहेत. 

मनोरंजन विश्वातील कलाकारही हे चॅलेंच अनुभवत आहेत. यातच त्यांचे जुने फोटो पाहायला त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतय. अभिनेत्री उर्मिला कोठारेनेही हे चॅलेंज केलं. मात्र थोड्या हटके पद्धतिने. कारण उर्मिलाने 20 नाही तर ती 18 वर्षांची असतानाचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. उर्मिलाचा हा जुना फोटो पाहुन तिच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय इंडस्ट्रीतील तिच्या कलाकार मित्र-मैत्रीणींनीही या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अमृता खानविलकर यांनीही या फोटोवर कमेंट केल्या आहेत.


प्रेग्नंसी आणि मुलगी जीजाच्या जन्मानंतर उर्मिला स्क्रिनवर झळकली नाही. त्यामुळे उर्मिला पुन्हा एकदा स्क्रिनवर कधी झळकणार याचीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive