By  
on  

‘वाघ चा स्वॅग’ पाहिलात का ? आता अमेय वाघला पाहता येणार इथेही 

लॉकडाउनमध्ये घरात बसून सगळेच विविध गोष्टी करत आहेत. मनोरंजन विश्वातली कलाकार मंडळी तर या मिळालेल्या वेळेचा चांगलाच सुदपयोग करत आहेत. या लॉकडाउनमध्ये त्यांनी घरात बसूनच विविध काम सुरु केलं आहे. कुणी काही शिकतय तर कुणी काही व्हिडीओ शूट करुन पोस्ट करत आहेत. नेहमीच क्रिएटीव्ह काम करणारा बहुगुणसंपन असा अमेय वाघही या लॉकडाउनमध्ये त्याच्या विनोदी कलेचा उपयोग करतोय. 
परदेशातून भारतात आलेला अमेयचा क्वारंटाईन टाईम संपला असला तरी इतरांप्रमाणे तो घरीच आहे. मात्र घरात बसून काही दिवस त्याचे काही विनोदी व्हिडीओ त्याने पोस्ट केले होते. या व्हिडीओला व्ह्यूवर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता अमेय वाघने स्वत:चं युट्यूब चॅनलचं सुरु केले आहे. 

या युट्यूब चॅनलचं नाव त्याने 'वाघ चा स्वॅग' असं ठेवलय. आता सोशल मिडीयावर पाहता येणारे अमेयचे हे एन्टरटेनिंग व्हिडीओज आता त्याच्या या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. याविषयीच माहिती स्वत: अमेय वाघने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरून दिली. अमेय लिहीतो की, “कलाकार म्हणून जी energy आहे ती channelise करता यावी म्हणून हे “YouTube Channel “ काढलय! पटकन subscribe मारा! हळू हळू माल upload होतोय !”आता अमेयचा आणखी कोणता स्वॅग त्याच्या चॅनलवर पाहायला मिळेल हे पाहणं रंजक ठरेल. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive