By  
on  

 पाहा Video : रिंकू राजगुरुने अशी साकारली 'हंड्रेड'मधील नेत्रा

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या अभिनयाचं सगळीकडे सध्या कौतुक होतय. नुकतच रिंकूने 'हंड्रेड' या वेब सिरीजमधून वेब दुनियेत पदार्पण केलय. आणि पहिल्याच पदार्पणात तिला यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतय. या वेब सिरीजमध्ये रिंकू नेत्रा पाटील नावाची मिडल क्लास मुलगी दाखवली आहे. रिंकूचं हे कॅरेक्टर सिरीजमध्ये पाहायला मजेशीर आणि रंजक वाटतं. तशा तिला प्रतिक्रियाही मिळत आहेत.

मात्र रिंकून ऑफ कॅमेरा नेत्रा पाटील तिच्या चाहत्यांसाठी आणली आहे. नुकतच रिंकूने या वेब सिरीजचे मेकिंग व्हिडीओ पोस्ट केले आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेरामागची चित्रीकरणा दरम्यानची मस्ती पाहायला मिळतेय. 

या वेब सिरीजमध्ये रिंकूशिवाय लारा दत्ता, करण वाही, मकरंद देशपांडे आणि इतर कलाकारही आहेत. मात्र रिंकू आणि लाराच्या भूमिकेभोवती ही कहाणी फिरते.

Recommended

PeepingMoon Exclusive