By  
on  

 लॉकडाउनमध्ये तुम्ही करताय ना व्यायाम ? भूषण प्रधानचे व्हिडीओ पाहा आणि व्हा फिट

लॉकडाउनमध्ये सध्या घरात बसून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग बहुतांश लोकं करत आहेत. यातच घरात बसून फिट राहणंही तितकच गरजेचं आहे. यासाठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिट राहण्याचे धडे देत आहेत. शिवाय फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचे आवाहन कलाकार करत आहेत.

अभिनेता भूषण प्रधान हा मराठी सिनेसृष्टीतला एक हँडसम आणि फिट कलाकार आहे. आणि सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो फिट राहण्याचे धडे देत आहे.  त्याचे वर्कआउट व्हिडीओ तो सध्या पोस्ट करत आहे. #bhushanworkouts म्हणत तो विविध वर्कआउट व्हिडीओ पोस्ट करत आहे.

शिवाय भूषण हा सध्या घरात कुकिंगही करत आहे. त्याने बनवलेल्या विविध पदार्थांचे फोटो तो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive