By  
on  

“आपल मन सगळं जग फिरुन येऊ द्या” म्हणत रिंकू करतेय घऱी थांबण्याचं आवाहन

सध्या लॉकडाउनचे दिवस हळूहळू वाढत असताना घरातच हा वेळ घालवावा लागतोय. मात्र या काळात परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन संयम बाळगून घरातच राहणं योग्य आहे आणि याविषयीचं आवाहन कलाकार मंडळीही करत आहेत.

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही सध्या तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरून सगळ्यांना घरात राहण्याचं आवाहन करत आहेत. सगळ्यांनाच घराबाहेर पडण्याची इच्छा आहे. मात्र ही इच्छा मनातच पूर्ण करून घरी थांबण्याचं आवाहन रिंकू करतेय. रिंकूने ती मनसोक्त झोपाळ्यावर झुलत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रिंकू लिहीते की, “आपल मन सगळं जग फिरुन येऊ द्या,पण तुम्ही घरीच थांबा.” या साध्या सोप्या शब्दात आणि या व्हिडीओतून रिंकू खूप काही सांगून जातेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकूने नुकतच 'हंड्रेड' या वेब सिरीजमधून वेबविश्वात पदार्पण केलं आहे.या सिरीजमधील रिंकूच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive