By  
on  

 बॉयफ्रेंड प्रदीपला मानसीने अशी घातली लग्नाची मागणी

अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना मानसी नाईकने या वर्षी तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. मानसीने तिच्य वाढदिवसाला तिच्या जोडीदाराविषयी सोशल मिडीयावर सांगीतल. बॉयफ्रेंड प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट करत तिने प्रेमाची कबुली दिली होती. 
मात्र नुकतच मानसीने असं काही केलं की चाहते चांगलेच पेचात पडले. मानसीने प्रदीपसोबतच फोटो नुकताच पोस्ट केला आहे. मात्र या पोस्टमध्ये लिहीलेलं कॅप्शन चाहत्यांना जास्त आवडत. मानसी या कॅप्शनमध्ये लिहीते की, “मला तुझं शेवटचं नाव (आडनाव) आवडतं, मला मिळेल का ते ?” असं म्हणत मानसीने थेट प्रदीपला लग्नाची मागणी घातली. पिपींगमून मराठीला दिलेल्या एका लाईव्ह मुलाखतीत मात्र रिलेशनमध्ये प्रदीपनेच सर्वप्रथम मागणी घातली असल्याचं मानसी बोलली होती. मात्र मानसीने आता जगासमोर प्रदीपला ही पोस्ट करत लग्नाची मागणी घातल्याचं पाहायला मिळतय. 

सध्या लॉकडाउनमुळे दोघही घरात एकत्र राहत आहेत. मात्र चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे मानसी आणि प्रदीपची भेट झाली होती. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive