By  
on  

मांजरीच्या पिल्लावर जडला सैराटच्या रिंकूचा जीव, अशी घेतेय काळजी

'सैराट'ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. लॉकडाउनच्या काळात ती तिच्या घरी असलेल्या मांजरींसोबत वेळ घालवतेय. लॉकडाउनमध्येच तिच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. 
सध्या रिंकू या मांजरीच्या पिल्लांसोबत वेळ घालवत आहे. त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर शेयर करत आहे. नुकताच रिंकूने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रिंकू मांजरीच्या पिल्लाला चमच्याने दूध प्यायला देत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिल है छोटा सा

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

या पोस्टला रिंकूने मजेशीर कॅप्शन लिहीलं आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “दिल है छोटा सा ..”या छोट्या जीवासोबत रिंकू वेळ घालवताना दिसत  आहे. शिवाय तिच्या घरात नुकतच पक्षांनी घरटं केलं होतं. त्या चिमणीच्या पिल्लाला हातात घेऊनही तिने व्हिडीओ केला होता.

नुकतीच रिंकू राजगुरुची ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमधील रिंकूच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. सध्या रिंकू घरातच असून कुकिंग, चित्रकला, व्यायाम या गोष्टी करत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive