By  
on  

मानसी नाईक आणि बॉयफ्रेंडने त्या फोटोंवर लिहीलय #HusbandandWife, सोशल मिडीयावर मानसी-प्रदीपच्या लग्नाची चर्चा

मराठी कला विश्वातली उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईकने याच वर्षी तिच्या वाढदिवसाला एक महत्त्वाची घोषणा केली होती. ती प्रेमात असल्याचं आणि तिच्या पार्टनरविषयी तिने सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगीतलं. 

मानसीने बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबतचा फोटो पोस्ट करून दोघं डेट करत असल्याचं सांगीतलं होतं. त्यानंतर सोशल मिडीयावर दोघांचे कपल गोल्स फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. 
मात्र नुकत्याच त्यांच्या पोस्टमध्ये असे काही दिसलय जे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांच्या काही पोस्ट आणि टिक टॉक व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दोघांनी हॅशटॅगमध्ये हसबंड एन्ड वाईफ असा उल्लेख केला आहे. आता हे हॅशटॅग वापरण्याचं नेमकं कारण काय हे दोघचं सांगू शकतील. सध्या लॉकडाउनच्या काळात दोघं एकत्र राहत आहेत. मात्र या कालावधीत हा हॅशटॅग वापरल्याने दोघांनी लग्न केलं की काय हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. 

नुकतच मानसी नाईकने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिने प्रदीपचं आडनाव आवडत असल्याचं म्हटलं होतं. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive