By  
on  

जेव्हा परश्या सह्याद्रीच्या कुशीत विसावतो तेव्हा.. ,पाहा Photos

‘सैराट’ या सिनेमानंतर या सिनेमातील परश्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. आकाश ठोसरने साकारलेला परश्या प्रेक्षकांना प्रचंड आवडला. सुरुवातील कुस्ती खेळणारा हा तरुण अभिनय क्षेत्रात आला आणि त्याचं आयुष्यचं बदललं. त्यानंतर काही मराठी सिनेमात, वेब फिल्ममध्येही आकाश झळकला आहे.

आकास ठोसरला फिटनेसची आवड कुस्तीपासूनच लागली होती. सध्या लॉकडाउनमध्येही तो त्याच्या फिटनेसकडे चांगलच लक्ष देत आहे. शिवाय त्याच्या थ्रोबॅक आठवणीही पोस्ट करतोय. आकाशला ट्रेकिंगची, प्रवास करायची आवड असल्याचं त्याच्या सोशल मिडीया पोस्टवरुन लक्षात येतय. नुकतेच त्याने त्याचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. सह्याद्री पर्वतरांगावर केलेल्या ट्रेकिंगच्या या आठवणी आहेत. सह्याद्री पर्वताच्या कुशित विसावलेला आकाश या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

या पोस्टमध्ये आकाश लिहीतो की, “आयुष्यात एक प्रवास आवर्जून असा करावा, सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा.” तेव्हा लॉकडाउननंतर सगळं सुरळीत झाल्यावर आकाश पुन्हा त्याची ट्रेकिंगची आवड जोपासेल एवढं नक्की. 

Recommended

PeepingMoon Exclusive