By  
on  

चाहत्यांसाठी शेवंता घेऊन येणार हे सरप्राईज, पोस्ट केला व्हिडीओ

'रात्रीस खेळ चाले' या हॉरर मालिकेला प्रेक्षकांची पसंती लाभली. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या नव्या भागात पाहायला मिळालं एक नवं पात्र. हे पात्र म्हणजे शेवंता. शेवंताची मालिकेतील एन्ट्री, तिचा पेहराव, बोलणं, चालणं या सगळ्याच दृष्टीने शेवंता हटके ठरली. आणि शेवंता चांगलीच प्रसिद्ध झाली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंता हे पात्र साकारलं आणि तिच्या करियरला एक वेगळीच वाट मिळाली.

सध्या लॉकडाउनमध्ये अपूर्वा घरीच आहे. मात्र घरात बसूनही कुकिंग करणं आणि विविध गोष्टी ती करत आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ती काहीतरी खास घेऊन येत असल्याचं सांगत आहे. नुकताच अपूर्वाने तिचा यूट्यूब चॅनेल सुरु केला आहे. आणि याच चॅनेलवर तिचं हे सरप्राईज पाहायला मिळणार आहे. नुकताच अपूर्वाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “कंटाळा आलाय ? आता कंटाळण्याची गरज नाही, मला यूट्यूबवर भेटा.”
तेव्हा शेवंता म्हणजेच अपूर्वा तिच्या चाहत्यांसाठी काय घेऊन येत आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive