By  
on  

या सिनेमासाठी पुष्कर जोगने स्वत: केले होते हे स्टंट, सिनेमाला 13 वर्षे पूर्ण

हिंदी सिनेमातला 'क्रिश', इंग्रजी सिनेमातला 'सुपरमॅन' या सुपर हीरो सिनेमांप्रमाणे मराठीतही 'जबरदस्त' या सिनेमात सुपर पॉवर असलेला सुपर हीरो पाहायला मिळाला होता. अभिनेता पुष्कर जोग या सिनेमात झळकला होता. प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी या  सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नुकतच या सिनेमाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेता पुष्कर जोगने या सिनेमाच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. या सिनेमादरम्यान केलेल स्टंट्स पुष्कर स्वत: कशा पद्धतिने केले होते हे या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतय

 

एक वेगळीच शक्ति असलेला कोट घालून सिनेमातल्या हीरोमध्ये येणारी ताकद आणि शत्रूंचा तो याच्या मदतीने कसा सामना करतो अशी जवळपास या सिनेमाची कहाणी होती. पुष्करसोबतच या सिनेमात मानसी नाईक, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिध्दार्थ जाधव, संजय नार्वेकर, रसिका जोशी हे कलाकार होते. अजय-अतुल यांनी या सिनेमाचं संगीत दिलं होतं. हा सिनेमा मराठीतला पहिला सुपर हीरो सिनेमा होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive