अभिनय बेर्डे म्हणतो,“गेली कुठे शोधा ती रक्कमा”

By  
on  

प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा 'अशी ही आशिकी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही फ्रेश जोडी एकत्र येत आहे. या सिनेमातलं “झालो मी निकम्मा,  गेली कुठे शोधा ती रक्कमा” एक धम्मला गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे, अभिनेता अभिनय बेर्डेवर हे चित्रीत करण्यात आलं असून आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या प्रियकराचे हाल यात मांडण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणेच अभिनय सर्वांना या जबरदस्त गाण्यातून आपल्या तालावर थिरकायला लावणार यात शंका नाही.

अभिनयने या सिनेमात ‘स्वयम’ आणि हेमलने ‘अमरजा’ नावाचे पात्र साकारले आहे. नवीन जोडी, ऐकायला मिळणारी नवीन नावं आणि एकंदरीत संपूर्ण टीझर सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरलाय आणि आता ह्यात गाण्यांची भर पडलीय. सिनेमाचे टायटल, हिरो-हिरोईनची जोडी, सिनेमाची झलक, लोकेशन्स इत्यादी गोष्टींमुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ‘अशी ही आशिकी’ची तितक्याच दर्जेची कथा-पटकथा आणि संवाद असणार कारण सचिनजी यांनी स्वत: ही जबाबदारी पार पाडली आहे.

गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’चे पहिले टीझर नुकतेच लॉंच करण्यात आले. टी-सिरीज निर्मित करत असलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या सिनेमाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या सिनेमाचे निर्माते आहेत.

येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ च्या निमित्ताने ही फ्रेश आणि हटके लव्हस्टोरी असलेला ‘अशी ही आशिकी’ १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

https://youtu.be/yco0ZJPzCBU

 

Recommended

Loading...
Share