By  
on  

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला इथून वाढली अभिनय क्षेत्राची ओढ, शेयर केली ही जुनी आठवण

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा देत नेटकरी व्यक्त होत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार तर हा जुन्या फोटोंचा ट्रेंज मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत. यातच जुन्या सोनेरे क्षणांना आणि त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने त्याचे काही जुने फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंचं आणि त्याच्या अभिनय क्षेत्रात येण्याचं जवळचं नातं  आहे. पुण्यातील सुदर्शन रंगमंचापासून अभिनय क्षेत्रात सिध्दार्थची ओढ वाढली. यासाठी तो त्याच्या वर्ग शिक्षक यांचेही आभार मानतोय. तो पोस्टमध्ये लिहीतो की, "दहा वर्षांपूर्वी सुदर्शन रंगमंच पुणे, कडून grips theatre करायला मिळालं. तिथून अभिनय क्षेत्राची ओढ वाढत गेली. तिथे जे शिकलो ते परत कुठेच नाही शिकायला मिळालं. १. पहिले २ फोटो - नाटक (रस्त्याचं गाणं) २. नाटक (मित्र माझे.) प्रमोद काळे यांनी रस्त्याचं गाणं हे नाटक बसवलं होतं. ते माझे वर्ग शिक्षक होते. त्यांनी मला पहिल्यांदा अभिनय शिकवला आणि इकडे खेचून आणलं. धन्यवाद सर."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दहा वर्षांपूर्वी सुदर्शन रंगमंच पुणे, कडून grips theatre करायला मिळालं. तिथून अभिनय क्षेत्राची ओढ वाढत गेली. तिथे जे शिकलो ते परत कुठेच नाही शिकायला मिळालं. १. पहिले २ फोटो - नाटक (रस्त्याचं गाणं) २. नाटक (मित्र माझे.) @pramodvkale यांनी रस्त्याचं गाणं हे नाटक बसवलं होतं. ते माझे वर्ग शिक्षक होते. त्यांनी मला पहिल्यांदा अभिनय शिकवला आणि इकडे खेचून आणलं. धन्यवाद सर.

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

या पोस्टसोबत सिध्दार्थने त्या जुन्या आठवणी असलेले फोटोही सोबत जोडले आहेत. चाहत्यांना आणि त्याच्या फॉलोवर्सना सिध्दार्थचे हे जुने फोटो आवडत आहेत. म्हणूनच त्याच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive