"या महामारीला लाथ मारून बाहेर काढूयात" म्हणत सचिन यांना आठवला हा सिनेमा

By  
on  

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा कित्येकांना कंटाळा आला असेल. अभिनेता सचिन पिळगावकरही या परिस्थितीला वैतागलेले दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी केली आहे एक पोस्ट.'सत्ते पे सत्ता' या त्यांच्या सिनेमाचा फोटो पोस्ट करत सचिन हे सध्याच्या परिस्थितीवर बोलते झाले. त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलय की, "या महामारीला लाथ मारून बाहेर काढुयात,चेण कुली की मेण कुली की चेण." 

 

त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहीलेला डायलॉग जास्त लक्ष वेधतोय. त्याचं कारण म्हणजे 'सत्ते पे सत्ता' या सिनेमातील हा डायलॉग आहे. जेव्हा सिनेमातील नायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा फाईट सीन सुरु असतो तेव्हा त्याची सगळी भावंंडं 'चेण कुली की मेण कुली की चेण'  असं म्हणतात. आणि  हे असच म्हणायची वेळ सध्या आली असल्याचं सचिन यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

सचिन पिळगावकर हे नुकतेच इन्स्टाग्रामवर दाखल झाले आहेत. त्यातच त्यांच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात.

 

Recommended

Loading...
Share