By  
on  

ऐन तरुणपणात या अभिनेत्याला करावा लागत आहे वृद्धाचा रोल, ओळखलं का या अभिनेत्याला?

अभिनय उत्तम वठावा यासाठी कलाकाराला काय काय करावं लागेल सांगता येत नाही. कधी कधी तरुणपणीच वृद्धाचा वेषही धारण करावा लागतो. अमेय वाघच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.


अमेय हा अत्यंत हरहुन्नरी कलाकार आहे. त्याने नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज अशा प्रत्येक प्रकारात अभिनयाची छाप उमटवली आहे. विशिष्ट व्यक्तिरेखेसाठी कलाकाराला समर्पित व्हावं लागतं याची अमेयला पुरेपूर जाणीव आहे. याचा प्रत्यय अलीकडेच आला.

[video width="640" height="362" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/VID-20190122-WA0006.mp4"][/video]

अमेय सध्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. आठ वर्षांनी पुन्हा अमेयने या नाटकात भूमिका साकारली आहे. या नाटकात तो फाल्गुनरावांच्या भूमिकेत आहे. अमेयने नुकतेच या वेषातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यातला फाल्गुनरावांच्या वेषातील अमेय अजिबात ओळखू येत नाही.

[video width="480" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/VID-20190121-WA0006.mp4"][/video]

अमेय या नाटकासोबतच एका हिंदी वेबसिरीजमध्येही झळकणार आहे. थ्रिलर प्रकारात मोडणा-या या वेबसिरीजचं नाव ‘असुरा’ असं आहे. या सिरीजमध्ये तो अर्शद वारसीसोबत झळकेल. या वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी अमेय अत्यंत उत्सुक आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive