By  
on  

प्रार्थना बेहेरेचा हा लुक पाहुन चाहते झाले थक्क, 45 दिवसांत घटवलं इतकं वजन

लॉकडाउनच्या काळात कित्येकांना घरात बसून फिटनेसची आवड निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीत निरोगी आरोग्य आणि फिट राहण्यासाठी व्यायाम आणि विविध ट्रेनिंग घेतल्या जात आहेत. त्यातच जीम बंद असल्याने घरातच ऑनलाईन ट्रेनिंगही सुरु करण्यात आल्या आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने देखील फिटनेससाठी ऑनलाईन ट्रेनिंगला सुरुवात केली होती. 45 दिवसांचं हे ट्रेनिंग चॅलेंज केल्यानंतर प्रार्थना चांगलीच फिट दिसू लागली आहे. आणि याचाच पुरावा म्हणून तिने ट्रेनिंगच्या आधीचे आणि ट्रेनिंग नंतरचे फोटो शेयर केले आहेत. म्हणजेच तिचा बिफोर एन्ड आफ्टर लुक पाहून सगळेच थक्क झाले आहेत. प्रार्थनाच्या या फिटनेस अवताराल चाहत्यांची पसंती देखील मिळाली आहे. 

 

मात्र हे चॅलेंज इथेच न संपवता हे ट्रेनिंग पुढे सुरु ठेवण्याचं प्रार्थनाने ठरवलं आहे. त्यामुळे प्रार्थनाचे आणखी फिट लुक येत्या काळात पाहायला मिळतील एवढं नक्की. 

Recommended

PeepingMoon Exclusive